नेकनूर (रिपोर्टर): नांदेडहून पुण्याकडे निघालेल्या एसटी बसने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने यामध्ये एक जण जागीच ठार तर एकास गंभीर मार लागला. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास पाटील पेट्रोलपंपासमोर घडली. जखमीस बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
किशोर निर्मळ (वय 52 वर्षे, रा. नेकनूर) हे सकाळी आपली मोटारसायकल (क्र. एम.एच. 44 ए. डी. 3666) यावर एका साथीदारासमवेत जात होते. नेकनूरजवळील पाटील पेट्रोल पंपासमोर त्यांच्या मोटारसायकलला नांदेडहून पुण्याकडे निघालेली एसटी बस क्र. एम.एच. 20 बी.एल. 4052) ने जोराची धडक दिली. यामध्ये किशोर निर्मळ हे जागीच ठार झाले तर त्यांच्या सोबत असलेले अन्य एकजण जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.








