नेकनूर, (रिपोर्टर)ः- टेंडर भरण्याच्या कारणावरून नेकनूरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला होता. यात काही जण जखमी झाले होते. या प्रकरणी संबंधिताकडून तक्रार दाखल झाली नव्हती. गावातील शांतता भंग केल्याच्या प्रकरणावरून पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत माजी जि.प. सदस्य भारत काळे सह अन्य दहा ते बारा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
दि .27 डिसेंबर रोजी नेकनूर बसस्थानकासमोर काळे शिंदे यांच्यामध्ये टेंडर भरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे पर्यावस्न हाणामार्यात झाले. यामारहाणीत काही जण जखमी झाले होते. संबंधिताकडून कसलिही तक्रार दाखल होत नसल्याने पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी दत्तात्रय बळवंत यांच्या फिर्यादीवरून भारत काळे, रविंद्र काळे, दादाराव काळे, संतोष शिंदे, चक्रधर शिंदे, गणेश काळे यांच्यासह आदी दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहेत.









