बीड, (रिपोर्टर)ः- नगर पालिका निवडणूक झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज मध्यरात्री उशीरा बीडमध्ये डेरेदाखल होत असून उद्या सकाळी ते जिल्हा परिषदेच्या अंतर्गत करण्यात येणार्या जवळपास एक हजार कामांचे प्रतिनिधिक स्वरूपात भुमिपूजन आणि कार्यारंभ आदेश वाटप करणार आहेत. जिल्हा परिषद आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर आणि नगर पालिका निवडणुकीनंतर अजित पवार जिल्ह्यात येत असल्यामुळे त्यांच्या या दौर्याला विशेष महत्व आहे.
बीड नगर पालिकेसह इतर दोन नगर पालिका अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला यश मिळाले असून राज्यात प्रतिष्ठेची केलेल्या बीड नगर पालिकेमध्ये नगराध्यक्ष पद जरी त्यांच्या पक्षाला मिळाले असले तरी नगर पालिकेत बहुमत नसल्यामुळे उपाध्यक्ष आणि सभापती पदासाठी कसरत करावी लागणार आहे. त्याचा ताळमेळ ते उद्याच्या दौर्यात बीडमध्ये कसे लावतात हे विशेष… त्या सोबतच येत्या दोन दिवसात राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची आचार सहिंता लागणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात बीड लागेल की नाही याबाबत मात्र शंका आहे. असे असतांनाच उद्या अजित पवार बीडमध्ये येत आहेत. त्यांच्या हस्ते सकाळी सहकार भवनाचे भुमिपूजन, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा नियोजन निधीतून दहनदपन भुमि, शाळा दुरूस्तीचे कामे, नवे शाळा इमारतीचे कामे, पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम, घरकुल विभागामार्फत दिवाळीपयर्ंत 50 हजार घरकुल बांधून जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे त्या कामात ज्यांनी चंागले काम केले आहे त्यांना प्रसिध्दीपत्रक देणे आणि दोन वर्षापासून रखडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे 64 शिक्षकांना वितरण करणे आदी भरगच्च कार्यक्रम उद्या पवारांच्या हस्ते होणार आहेत.








