गेवराईचे खेळाडू देशपातळीवर नावलौकिक मिळवतील– जालिंदर धांडे
क्रिडा महोत्सवात मालेगाव येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन
गेवराई दि.३० रिपोर्टर
शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले वातावरण तयार झाले आहे, सध्याची युवापिढी मोबाईलच्या रिल्स मध्ये अडकली असताना रणवीर पंडित यांनी शालेय विद्यार्थ्यांना मैदानावर आणून मोठे काम केले आहे असे गौरवोद्गार पत्रकार गणेश सावंत यांनी केले तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रणवीर पंडित यांनी या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे, गेवराई सारखीच ही चळवळ आपण बीड जिल्ह्यात सुरु करावी, शिवछत्र परिवाराने सामाजिक क्षेत्रा बरोबरच क्रीडा क्षेत्रातील काम पाहता एक दिवस हे खेळू देशपातळीवर नावलौकिक मिळवतील असा विश्वास संपादनक जालिंदर धांडे यांनी व्यक्त केला. जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत शारदा क्रीडा महोत्सवात मालेगाव येथील शिवाजी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी मालेगाव येथील शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भव्य मैदानावर व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, पत्रकार गणेश सावंत, जालिंदर धांडे
जयभवानीचे माजी संचालकअप्पासाहेब खराद, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव गंगाधर, बळीरामजी खराद,जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक नंदकिशोर गोरडे, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जाधव, चेअरमन पवन चव्हाण, अंगदराव खरात, सरपंच बबनराव बोरकर, विश्वनाथ सोनवणे, विलास वाघमोडे, संदीप मडके, परिक्षीत जाधव, देविदास खरात, अशोक बोरकर, कल्याणराव खरात, शिवाजीराव खरात यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.







प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सार्थक लेंडगुळे या विद्यार्थ्यांने खेळाडूंना शपथ दिली.त्यानंतर मुले आणि मुलाच्या गटांमध्ये होणाऱ्या होणाऱ्या या व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, दोन मैदानावर होणा-या या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये संस्थेचे १८ शाळेचे संघ सहभागी झालेले आहेत.
क्रीडा महोत्सवात नाविण्य आणण्याआचा आमचा प्रयत्न—रणवीर पंडित
क्रीडा महोत्सवाचे है चौथे वर्ष असून विद्यार्थी खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. क्रीडा महोत्सवात नाविण्य आणण्याआचा आमचा प्रयत्न असून या वर्षी जलतरण स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. विविध स्पर्धांमध्ये खेळाडूंने उत्तम खेळाचे प्रदर्शन करणे हे आपल्यासाठी समाधानाची गोष्ट आहे असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संभाजी सोनवणे यांनी केले. शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सदाशिव गंगाधर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









