दोन दिवसांपूर्वी मोटारसायकलवर जाणार्या तिघांना करण्यात आली होती बेदम मारहाण
बीड (रिपोर्टर): मोटारसायकलवर जाणार्या तिघा जणांना 20 ते 25 जणांनी परवा रात्री बेदमपणे मारहाण करून गंभीररित्या जखमी केले होते. या घटनेचे आज तिव्र पडसाद उमटले असून या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कावाई करण्यात यावी या मागणीसाठी भायाळा, वैद्यकिन्हीचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. जवळपास एकतास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
परवा रात्री महादेव राख, योगेश राख यांच्यासह अन्य काही जण मोटारसायकलवर जात होते. त्यांना वैद्यकीन्हीच्या रस्त्यावर अडवून बेदमपणे मारहाण करण्यात आली. ही मारहाण राहूल शिंदे, अशोक शिंदे यांच्यासह 20 ते 25 जणांनी केली. सदरील आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज भायाळा आणि वैद्यकीन्ही येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. टोलनाक्याजवळ जवळपास एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीस प्रशासनासह तहसीलदारही दाखल झाले होते. प्रशासनाने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. सदरील आंदोलनकर्त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.









