बीड (रिपोर्टर): उसाच्या ट्रॅक्टरने ट्रकला धडक दिल्याने ट्रक चालक गंभीररित्या जखमी होऊन ठार झाल्याची घटना सिरसाळा ते सोनपेठ रोडवर घडली आहे तर दुसरा अपघात आष्टी तालुक्यातील नगर ते जामखेड रोडवर घडला आहे. टिप्परने मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने मोटारसायकलला स्वाराचा मृत्यू झाला.
रमेश पंडित देवकर यांच्या ट्रकला उसाने भरलेला ट्रॅक्टर क्र. एम.एच. 44 झेड. 0937 ने धडक दिली. यामध्ये ट्रकचालक रमेश देवकर गंभीररित्या जखमी होऊन ठार झाला. ही घटना सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीतील सिरसाळा-सोनपेठ रोडवर आचार्य टाकळी पाटीजवळ घडली. दुसरी अपघाताची घटना आष्टी तालुक्यातील नगर ते जामखेड रोडवर पोखरी फाट्यावर घडली. मोटारसायकलस्वारास टिप्पर क्र. पी.जे. 19 जे.जे. 5391 ने धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार गंभीररित्या जखमी होऊन ठार झाला. या दोन्ही घटनेप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









