रामकृष्ण लॉन्स येथे सायंकाळी 6 वाजता आयोजन; उपस्थित राहण्याचे शेख तय्यब यांचे आवाहन
बीड :
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सर्वांचे लाडके नेते दिवंगत अजित दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीड शहरवासीयांच्या वतीने आज शनिवार, दि. 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता रामकृष्ण लॉन्स, बीड येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोकसभेला दादांच्या सर्वपक्षीय चाहत्यांनी, नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शेख तय्यब यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. बीड जिल्ह्याचे पालकत्व सांभाळताना अजित दादांनी जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच सढळ हाताने मदत केली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते सदैव धावून येणारे नेतृत्व होते. त्यांच्या अकाली जाण्याने सर्व समाजमन हेलावून गेले असून, संपूर्ण बीड जिल्हा शोकमय झाला आहे.
आपल्या आवडत्या, कर्तृत्ववान आणि लोकाभिमुख नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सायंकाळी रामकृष्ण लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या सर्वपक्षीय शोकसभेत शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे पुन्हा एकदा शेख तय्यब यांनी आवाहन केले आहे.









