• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

चौसाळा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 51 लाखांहून अधिक किमतीचे अवैध विदेशी मद्य जप्त

by गणेश सावंत
March 14, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर):  सोलापूर-बीड मार्गावरील चौसाळा शिवार परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (दि. 12 मार्च) धडक कारवाई करत गोव्याहून महाराष्ट्रात अवैधरित्या आणल्या जाणार्‍या विदेशी मद्याची मोठी तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत तब्बल 51 लाख 88 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मद्य वाहतूक करणारा ट्रक हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला सोलापूर-बीड महामार्गावरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागाच्या पथकाने चौसाळा शिवार परिसरात सापळा रचून संशयित वाहनांवर नजर ठेवली. दरम्यान, संशयास्पद हालचाल आढळल्याने अशोक लेलँड कंपनीचा सहा चाकी ट्रक (क्र. चक 23 -ण 7275) थांबवून त्याची सखोल तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान ट्रकमध्ये माल लपवण्यासाठी विशेष पद्धतीने तयार केलेला ‘चोर कप्पा’ असल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. या कप्प्याची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे 200 बॉक्स लपवून ठेवलेले आढळून आले. त्यानंतर अधिकार्‍यांनी मद्यासह ट्रक जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 51 लाख 88 हजार 520 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65 (अ), (ई), 80, 81, 83, 90 व 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या मद्य तस्करीमागील इतर आरोपी किंवा साखळीचा शोध घेण्याचे कामही विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, संचालक (दक्षता) प्रसाद सुर्वे, उपआयुक्त (संभाजीनगर) संगीता दरेकर तसेच अधीक्षक (बीड) विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निरीक्षक संजय कांगणे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक आर. बी. खाडगीर, तातळे, काळे, सहायक दुय्यम निरीक्षक शेख तसेच जवान काशिनाथ डुकरे, प्रशांत मस्के, अशोक नागरगोजे व इतर कर्मचार्‍यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

Previous Post

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

Next Post

इमामपूर रोडवर घरात सापडला गॅसच्या टाक्यांचा साठापोलीस, पुरवठा विभागाची कारवाई

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post

इमामपूर रोडवर घरात सापडला गॅसच्या टाक्यांचा साठापोलीस, पुरवठा विभागाची कारवाई

Please login to join discussion

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?