Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमधारूरमध्ये पाच परप्रांतियांना घेतले ताब्यात, दोघांकडे आढळली कॅश, धारूर पोलिसांकडून चौकशी सुरू

धारूरमध्ये पाच परप्रांतियांना घेतले ताब्यात, दोघांकडे आढळली कॅश, धारूर पोलिसांकडून चौकशी सुरू


बीड (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील उमराई वस्तीवर सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत आणि धारूर पोलिसांनी संयुक्तरित्या रेड मारून पाच परप्रांतियांना ताब्यात घेतले. त्यातील दोघांकडून मोठी कॅश पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत असून पाचही जणांची धारूर पोलीस कसून चौकशी करत आहे.


धारूर तालुक्यातील आडस परिसरात असलेल्या उमराई वस्तीवर पाच संशयित परप्रांतीय असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला मिळाली होती. त्यांनी सकाळी सहा वाजता धारूर पोलीसांना सोबत घेऊन तेथे रेड मारली असता दोघा जणांकडे मोठी कॅश मिळून आली. पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन धारूर पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ते परप्रांतीय बीडमध्ये केव्हा आले, कशासाठी आले, ते नेमके येथे करतात काय, त्यातील दोघांकडे मोठ्या प्रमाणात कॅश आली कुठून? यासह अन्य प्रश्‍नांची उकल पोलीस त्यांच्याकडून करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!