वडवणी (रिपोर्टर) शेतात पेरलेल्या बाजरीचे रानडुकराने प्रचंड नुकसान केले. पंचनाम्यासाठी वनविभागात हेलपाटे मारूनही पंचनामे होत नसल्याने आणि शेतकर्यालाच उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नैराश्य आलेल्या एका 62 वर्षीय शेतकर्याने त्याच शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे पहाटे पाच वाजता घडली.
नवनाथ आश्रुबा लगस (वय 22 वर्षे, रा. चिखलबीड) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. लगस यांनी एसबीआय बँकेकडून कर्ज घेतले होते. शेतात लावलेले पीक पाऊस न पडल्याने करपून गेल्याने ते त्याच्यावर नांगर फिरत गेल्या काही दिवसांपुर्वी बाजरी पेरली होती. बाजरी चांगली आली असताना ती रानडुकराने उदध्वस्त केली. त्याचा पंचनामा होऊन मदत मिळावी यासाठी शेतकर्याने वनविभागात हेलपाटे मारले मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. शेताचा पंचनामाही झाला नाही. एसबीआय बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेतून पहाटे पाच वाजता त्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्याची माहिती वडवणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्तळी जावून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिंचवण रुग्णालयात पाठवला.