बीड (रिपोर्टर) तरुणांच्या दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून शाब्दीक चकमक होत त्याचे रुपांतर मारामारी आणि दगडफेकीत झाले. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत या प्रकरणी धार्मिक भावना दुखवल्यामुळे शेख साजन शेख चांद याच्या फिर्यादीवरून पवन लाहोट सह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटना ही रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोंढा भागात घडली.
याबाबत अधिक असे की, रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहरातील मोंढा भागात तरुणांच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरून चकमक सुरू होत त्याचे रुपांतर मारामारीत झाले.या वेळी तरुणांनी दगडफेक केली. या दगडफेकीत गंभीरस्वरुपात कोणाला इजा झाली नाही. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पेठबीड पोलीस धावून आले. या वेळी दोन्ही गटाकडून मोठ्या संख्येने जमाव जमा झाला होता. पोलिसांनी सदरचे प्रकरण शांत केले. या प्रकरणी शेख साजन शेख चांद (रा. मन्सूरशहा दर्गा बीड) याने फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पवन लाहोटसह अन्य चार जणांवर धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.