बीड (रिपोर्टर) शहरातील धानोरा रोडची अत्यंत दुरावस्था झाली असून सदरील या रस्त्याचे काम करण्यात यावे, या मागणीसाठी नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.
शहरातून जाणार्या धानोरा रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे या मागणीचे निवेदन अनेक वेळा प्रशासनाकडे देण्यात आले होते. मात्र याकडे लक्ष दिले जात नसल्याने रस्त्याच्या कामासाठी नगरसेवक भैय्यासाठी मोरे, नगरसेवक रणजीत बनसोडे, जयराम यादव, जगदीश देशमुख, शरद सालगुडे, प्रेमचंद डुकरे, काळे धनंजय, आच्युतराव सोनवणे, गंगाधर नाईकवाडे, राजू लोखंडे, प्रभाकर पोकळे, गणेश तांदळे, साळवे सोनाजी, हातागळे रानबासह आदींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.