• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

पतीकडून पत्नीची हत्या, दरोड्याचा बनाव, रंजेगावात खळबळजनक घटना

by Beed Reporter
June 5, 2022
Reading Time: 1 min read
0
पतीकडून पत्नीची हत्या, दरोड्याचा बनाव, रंजेगावात खळबळजनक घटना
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नवर्‍याचं लफडं पत्नीला
समजल्यानंतर झाला होता वाद
पतीने पत्नीचा गळा दाबला
स्वत:चे हातपाय बांधून दरोड्याचा बनाव केला
बीड/पिंपळनेर (रिपोर्टर) बाहेरख्याली नवर्‍याचं लफडं पत्नीला समजल्यानंतर दोघात वाद झाला. संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना मध्यरात्री बीड तालुक्यातल्या रंजेगाव येथे घडली. सदरचा प्रकार घडल्यानंतर नवर्‍याने घरावर दरोडा पडल्याचा बनाव करत स्वत:चे हातपाय बांधून घेतले. पत्नीवर अत्याचार झाल्याची अफवा पेरली. अखेर पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या सहा तासात या प्रकरणातील सत्य बाहेर काढत नवर्‍याला ताब्यात घेतले. तर ज्योतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.

या खळबळजनक आणि धक्कादायक घटनेची अधिक माहिती अशी, पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथील दिनेश आबुज आणि ज्योती आबुज हे दाम्पत्य राहते. दिनेशचे आई-वडिल देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असल्यामुळे दिनेश आणि ज्योती हे आपल्या दोन मुलांसह घरी होते. रात्री या दोघांमध्ये वाद झाला. दिनेश याचे बाहेर प्रेमसंबंध असल्याची माहिती ज्योतीला समजली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादात संतापलेल्या दिनेशने ज्योतीचा गळा आवळून खून केला. सदरचा प्रकार हा अंगलट येईल म्हणून दिनेश याने स्वत:चे हातपाय बांधले आणि आरडाओरड केली त्यामुळे गावातील लोक जागे झाले आणि दिनेशच्या घराकडे धावले. दिनेशने त्यावेळी पाच ते सहा दरोडेखोर घरात घुसले, दरोडा टाकला आणि पत्नीला जिवे मारल्याचा कांगावा केला. या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे पीआय आघाव, पीएसआय ढाकणे यासह अन्य पोलीस पहाटेच घटनास्थळी गेले. सकाळी सात वाजेपर्यंत दिनेश हा दरोडा, लुटमार यावर ठाम होता. गावातील लोकही त्यापद्धतीने बोलत होते. मात्र लुटीची कुठलीही सकृतदर्शी घटना पहावयास मिळत नव्हती. महिलेच्या अंगावरचे दागिने तसेच होते, बळजबरीने घरात घुसल्याच्या खाणाखुणा नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. दरोडा आणि हत्येच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या तपासात आणि चौकशीत अखेर दिनेशनेच ज्योतीची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके हे घटनास्थळी गेले. श्‍वानपथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेतले आहे.

Previous Post

रस्ते-नाल्या करणे हे तर माझे कर्तव्य, परळीतील प्रत्येक नागरिकाच्या उत्पन्नात दुपटीने वाढ व्हावी, हे स्वप्न पूर्ण करायचं आहे – धनंजय मुंडे

Next Post

धानोरा रस्त्याच्या कामासाठी नगरसेवकांचे आमरण उपोषण

संबंधित बातम्या

क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post
धानोरा रस्त्याच्या कामासाठी नगरसेवकांचे आमरण उपोषण

धानोरा रस्त्याच्या कामासाठी नगरसेवकांचे आमरण उपोषण

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?