Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीडमध्ये २८ तर जिल्ह्यात ७५ पॉझिटिव्ह

बीडमध्ये २८ तर जिल्ह्यात ७५ पॉझिटिव्ह

लोळदगावात आठ दिवसात ३५ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू
बीड (रिपोर्टर)- लॉकडाऊन शिथील झाल्यापासून नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर निघू लागले आहेत. त्यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बीड तालुक्यातील लोळदगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून ३५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. आज आरोग्य विभागाला ५१० संशयित व्यक्तींचे अहवाल आले असून त्यामध्ये तब्बल ७५ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात सर्वाधिक बीडचे २८ रुग्ण आहेत.
सध्या सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड शहरात आढळून येत आहेत. लोळदगाव हे बीडपासून अवघ्या काही कि.मी.च्या अंतरावर असल्याने बीड शहरात व्यवसायासाठी येथे येतात. गेल्या आठ दिवसात या गावात ३५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला सहज घेऊ नये, प्रत्येक वेळी मास्क, सॅनिटायझर वापरणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. आज दुपारी पावणे बारा वाजता आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या ५१० संशयितांपैकी ४३५ जण निगेटिव्ह आले असून ७५ जण पॉझिटिव्ह आढळून आले ाहेत. यापैकी अंबाजोगाई १, आष्टी १६, बीड २८, धारूर १, गेवराई २, केज ८, माजलगाव ४, परळी ८, पाटोदा १, शिरूर २ तर वडवणी तालुक्यात ४ बाधीत आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!