बीड (रिपोर्टर)- विषारी औषध प्राशन केलेल्या एका 35 वर्षीय तरुणास जिल्हा रुग्णालयाच्या वार्ड क्र. 6 मध्ये दाखल करण्यात आले होते. या तरुणाने मध्यरात्री दोनच्या दरम्यान बाथरुमच्या खिडकीमधून उडी मारून दुसर्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदरील हाप्रकार डॉ. देशमुख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यास वार्डमध्ये दाखल करून उपचार केले.
महेश उद्धव गोडबोले (वय 35 वर्षे रा. मिरगाव ता. माजलगाव या तरुणाने विषारी औषध प्राशन केल्याने त्यास जिल्हा रुग्णालयाच्या वार्ड क्र. 6 मध्ये दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान या तरुणाने बाथरुमच्या खिडकीमधून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदरील हा प्रकार डीएमओ असलेल्या डॉ. प्रवीण देशमुख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यास पुन्हा त्याच वार्डामध्ये अॅडमिट करून उपचार केले.