Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडसिंदफणा नदीवरील बंधार्‍याला लागली गळती

सिंदफणा नदीवरील बंधार्‍याला लागली गळती

बीड (रिपोर्टर)- यावर्षी राज्यामध्ये चांगला पाऊस पडल्याने जवळपास सर्वच धरणे पुर्णत: भरली. आगामी काळात पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी प्रशासनाने याचे नियोजन करायला हवे. बंधार्‍यावर दरवाजे बसवले खरे मात्र अनेक बंधार्‍यातून पाण्याची गळती होऊ लागल्याने बंधार्‍यातील पाणी कमी होऊ लागले आहे. असाच प्रकार कुक्कडगाव शिवारातील सिंधफणा नदीवरील बंधार्‍यावर दिसून येऊ लागला. येथील बंधार्‍याला गळती लागल्याने सदरील पाणी बंद करण्याची मागणी केली जाऊ लागली.
मराठवाड्यात गेली चार-पाच वर्षे सतत दुष्काळ पडत होता. मात्र यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच चांगली हजेरी लावल्याने राज्यातील ९० टक्केपेक्षा जास्त धरणे पुर्णत: भरली. बीड जिल्ह्यातीलही १४४ धरणांमध्ये चांगले पाणी आले. काही बंधार्‍यावर दरवाजे बसवण्यात आल्याने या दरवाज्यातून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊ लागली. कुक्कडगाव शिवारातील सिंधफणा नदीच्या पात्रावर बंधार्‍यावर गेट टाकले मात्र त्यातून पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने बंधार्‍यातील पाणी झपाट्याने होत आहे. रब्बी पिकाला पाणी पुरेल या दृष्टीकोनातून पाटबंधारे विभागाने वेळीच पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी या भागातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!