विधान परिषदेच्या उमेदवारांची भाजपाकडून घोषणा; ओबीसी म्हणून राम शिंदेंना उमेदवारी,
मुंबई/बीड (रिपोर्टर) दहा जागांसाठी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांना यातून डावलल्याचे उघड झाल्याने मुंडे समर्थक भाजपाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करत असून भाजपाने या वेळेस मित्र पक्ष संघटनांनाही डावलल्याचे दिसून येते. शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांनाही उमेदवारी नाकारल्याने मेटे समर्थकही नाराज झाले आहेत.
भाजपाने आज आपल्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारती, उमा गिरीष खापरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत. विधान सभेच्या निवडणुकीत पंकजांचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर भाजप नेते आणि पंकजा मुंडे यांच्यात सातत्याने नाराजी वाढत गेली. या आधी दोन वेळा पंकजांना डावलण्यात आले. विधान परिषदेसह राज्य सभेबाबतही पंकजांना नुसते डावलण्यातच आले नाही तर विचारातही घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात येते. आता या वेळेस पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी शंभर टक्के खात्री मुंडे समर्थकात होती मात्र आज नाव घोषीत झाल्यानंतर पंकजांना पुन्हा एकदा भाजपाने डावलल्याचे उघड झाले. दुसरीकडे भाजपाने मित्र पक्ष संघटनांच्या नेत्यांनाही डावलले आहे. शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांनाही डावलण्यात आले असून सदाभ
भाजपाने राम शिंदेंच्या रुपाने
ओबीसीचा चेहरा समोर मांडला
पंकजा मुंडे आणि भाजपा नेतृत्वात गेल्या काही वर्षांपासून दरी आहे. राम शिंदे जेव्हा सत्तेत होते तेव्हा पंकजा मुंडे यांचे एक खाते काढून राम शिंदेंकडे दिले होते. 2019 च्या निवडणुकीत राम शिंदेंचा रोहीत पवारांकडून पराभव झाल्यानंतर राम शिंदे हे अडगळीला गेले होते. मात्र आता ओबीसी म्हणून राम शिंदेंना विधान परिषदेची उमेदवारी भाजपाने देऊन पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना डिवचल्याचे दिसून येते.
विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही उमेदवारांची नावे निश्चित
मुंबई (रिपोर्टर) विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही आपले पत्ते उघड करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी एकनाथ खडसे आण रामराजे निंबाळकर यांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने पक्षाचे मुंबई शहराध्यक्ष भाई जगताप यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
राज्यात 10 जागांसाठी होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत.