Tuesday, December 1, 2020
No menu items!
Home बीड गेवराई कांदाचाळचे लाभार्थी शेतकर्‍यांचे दिवाळी दिवशी उपोषण

कांदाचाळचे लाभार्थी शेतकर्‍यांचे दिवाळी दिवशी उपोषण

कांदाचाळचे लाभार्थी शेतकर्‍यांचे दिवाळी दिवशी उपोषण

कोळगाव (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यातील कांदाचाळ लाभार्थी शेतकर्‍यांनी कांदा चाळीचे काम पूर्ण होवून दहा महिन्याचा कालावधी लोटला असून या बाबत शेतकर्‍यांना या कांदाचाळीचे अद्याप अनुदान मिळाले नाही. दि.१५ नोव्हेंबर रोजी उपोषण सुरू केले असून जो पर्यंत अनुदान दिले जात नाही तोपर्यंत सोडणार नाही असा इशारा शेतकर्‍यांनी दिला.
गेवराई तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने मागच्या वर्षी मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकर्‍यांनी कांदाचाळीची उभारणी करण्यात आली. यामध्ये अनेक शेतकर्‍यांनी आधी स्वखर्चात कामे करून केलेल्या आहेत. काहींनी तर खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन कामे पूर्ण केले. पण स्थानिक प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी कांदाचाळीचे अनुदान दहा महिन्यानंतर विद्यमान तालुका कृषी अधिकारी सोनवणे म्हणतात की पैश्याची मागणी केली आहे. कोरोना, शिक्षक पदवीधर निवडणूकीचे कारण पुढे सांगतात. मग ही अनुदान रक्कम अदा केव्हा करण्यात येईल. संपूर्ण कामकाज ढेपाळले आहे. आता शेतकर्‍यांची कोरोना रोगांमुळे आणि सततच्या शेती नुकसानीमुळे परेशानी झाला असून आर्थिक परिस्थिती अडचणीत आले आहे. पैसे येत नसल्यामुळे प्रशांत गरूड, महादेव पवार, गणेश अहेर, किरण साळवे, नितीन सरवदे आदी शेतकर्‍यांना दिवाळी सणासुदीच्या काळात तालुका कृषी कार्यालयाच्या समोर उपोषण दि.१५ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू केले आहे.

Most Popular

पिसाळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी जोगेश्वरी पारगांव येथील महिला ठार

पांगुळगव्हाण येथील शेतकरी प्रसंगसावधनाने हल्ल्यात बचावले नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम तात्काळ जेरबंद करण्याची मागणी

बिबट्याला पकडण्यासाठी ताडोबा जंगलातले एक्सपर्ट आष्टीत

बिबट्या पाथर्डी परिसरातून आला, सकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरूआष्टी/बीड (रिपोर्टर)- नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तिघा जणांचा बळी घेतल्याने आष्टीसह पाटोदा आणि शिरूर तालुक्यात एकच...

महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण करणार विजयाची हॅट्रीक

सुजान पदवीधर मतदारांची सतिष चव्हाणांनाच सर्वत्र साथगेवराई (रिपोर्टर)-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, इंदिरा कॉंग्रेस आणि शिवसेना तसेच इतर मित्रपक्षांच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण विजयाची...