Saturday, December 5, 2020
No menu items!
Home क्राईम प्रेयसीवर अॅसीड टाकूण जाळणाऱ्या आरोपीला आठ दिवसाची पोलीस कोठडी

प्रेयसीवर अॅसीड टाकूण जाळणाऱ्या आरोपीला आठ दिवसाची पोलीस कोठडी

बीड (रिपोर्टर)
पोलीस स्टेशन नेकनुर हद्दीत येळंबघाट शिवारात ढाणे मंगल कार्यालयाचे जवळील खदानीत
प्रेयसीवर अॅसीड टाकूण जाळणाऱ्या आरोपीस काल देगलुर पोलीसांनी ताब्यात घेतले होते आज त्याला न्यायालयात हजर केले असता आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी पोलीस स्टेशन नेकनुर ता. बीड हद्दीत येळंबघाट शिवारात ढाणे मंगल कार्यालया जवळील खदानिमध्ये एक 22 वर्षीय महिला अर्धवट जळालेल्या स्थितीत पडलेली आहे अशी माहिती पोलीस स्टेशन नेकनुर येथे मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे व सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली असता सदर ठिकाणी एक महिला अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळुन आली . पोलीस पथकाने नमुद महिलेस तात्काळ उपचार कामी सरकारी वाहनामध्ये टाकुण प्रथम सरकारी दवाखाना नेकनुर येथे आणले व प्रथमोपचार करुण पुढील उपचार कामी सरकारी दवाखाना बीड येथे शरिक केले . त्यानंतर सदर जखमी महिलेकडे विचारपुस केली असता नमुद महिलेने तिचे नाव सावित्रा दिगंबर अंकुलवार , वय 22 वर्षे , व्यवसाय घरकाम रा . शेळगांव ता . देगलुर जि . नांदेड असे असुन ती तिचे मर्जीने मागील दोन वर्षापासुन घरी कोणालाही काहिही न सांगता ती तिच्या गावातील अविनाश रामकिसन राजुरे , वय 25 वर्षे , रा . शेळगाव , ता . देगलुर , जि . नांदेड याच्यासोबत शिरुर जि . पुणे येथे राहत होती . दिनांक 13/11/2020 रोजी दुपारी 12.00 वा सुमारास सावित्रा हिचा प्रियकर अविनाश राजुरे हा तीला फिरण्यास जावु असे म्हणुन तिला सोबत घेवुन मोटार सायकलवर निघाले होते . त्यानंतर ते दोघे रात्री 09.00 वा सुमारास मांजरसुंबा ते केज जाणारे रोडवर येळंबघाट येथील ढाणे मंगल कार्यालया शेजारी असणाऱ्या खदानी जवळील शेतात झोपले होते . दिनांक 14/11/2020 रोजी पहाटे 03.00 वा सुमारास अविनाश राजुरे याने सावित्रा हिचा अचानक तिचा गळा दाबला व तोंडावर , छातीवर , हातावर पेट्रोल व अॅसीड टाकुण तिला पेटवुन दिले व तो सदर ठिकाणावरुन पळुन गेला अशी हकीगत सांगीतल्याने नमुद महिलेचा जबाब नोंद करुन पोलीस स्टेशन नेकनुर येथे गु.र.नं. 257/2020 , कलम 307 , 326 ( अ ) भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे करत आहेत . उपचारा दरम्यान नमुद महिलेचा दिनांक 14/11/2020 रोजी रात्री 10.55 वा मृत्यु झाला असुन नमुद गुन्ह्यामध्ये कलम 302 भादवी ची वाढ करण्यात आली आहे . नमुद गुन्ह्यामधील आरोपी अविनाश रामकिसन राजुरे , वय 25 वर्षे याचा शोध घेणे कामी दोन तपास पथके रवाना केले होते . पोलीस स्टेशन नेकनुर यांनी पोलीस स्टेशन देगलुर , जि . नांदेड यांच्याशी समन्वय साधला असता नमुद आरोपीस देगलुर पोलीसांनी देगलुर , जि . नांदेड येथुन ताब्यात घेतले आहे . नमुद आरोपीस नेकनुर पोलीस स्टेशनचे तपास पथक ताब्यात घेवून आज त्याला न्यायालयात हजर केले असता आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मोठी बातमी – मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद : ऑनलाईन रिपोर्टर  मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग...

एकाच क्रमांाकाचे दोन ऍपे रिक्षे पोलीसांची चौकशी सुरू

बीड (रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीसांनी काही प्रवासी वाहतूक करणारे ऍपे रिक्षे ताब्यात घेतले आहे. यात दोन ऍपे रिक्षाचा नंबर एक सारखाच असल्याने...

सुप्रिया सुळेंना राज्याच्या नाही, केंद्राच्या राजकारणात रस -पवार

पुणे (रिपोर्टर)- भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय...

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...