Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमघरातून निघून गेलेल्या 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह विहरित आढळला

घरातून निघून गेलेल्या 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह विहरित आढळला

गेवराई (रिपोर्टर) दोन दिवसांपूर्वी पहाटे घरातून निघून गेलेल्या मुलीचा मृतदेह शहरापासून जवळच असलेल्या गोविंदवाडी शिवारतील एका विहिरीत बुधवार दि.18 रोजी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कु. सायली कल्याण पारेकर ( वय वर्ष 16) रा.गणेश नगर, ही गेवराई येथून सोमवार दि.16 रोजी पहाटे घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडताना, सायलीने मी मरतीय,माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका, अशी नोट लिहून ठेवली होती. तिच्या वडलांनी तातडीने मित्र, नातेवाईक, प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सांगून मुलीचा शोध घेण्याचे आवाहन केले होते. काल मंगळवार दि. 17 रोजी पोलीसात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीसांनी तिचा शोध घेतला. शहरातील कॅमेरे चेक केले मात्र ती कुठेच दिसून आली नाही. दरम्यान आज बुधवार दि.18 रोजी सकाळी गोविंदवाडी शिवारातील रस्त्यालगत मोटे यांच्या विहरित तिचा मृतदेह आढळून आला. सदरील, घटनेने शहरात खळबळ उडाली असून, सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांच्यासह पो.हे.कॉ.खरात, गोरे,जावळे, राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह विहरीबाहेर काढला व पंचनामा करून, मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!