दिंद्रुड (रिपोर्टर) माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे गेल्या अनेक दिवसापासून विजेचा लपंडाव आणि सतत अखंडित पुरवठा यामुळे गावकरी वैतागून गेले होते . अनेक वेळा येथील विद्युत कार्यालयाला भेट देऊन तोंडी व लेखी निवेदन देऊनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी आज दिंद्रुड येथील परळी चौकात तब्बल 1 तास रास्तारोको आंदोलन केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड हे गाव मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली असताना मागच्या काही दिवसांपासून विज वितरण कंपणीमुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवर यांनी सर्व गावकर्यांना सोबत घेत दिंद्रुड ग्रामपंचायत च्या वतीने बीड परळी हायवे वर परळी चौकात तब्बल 1 तास रास्तारोको आंदोलन केले.त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती.तब्बल 1 तास केलेल्या रास्तारोको आंदोलनानंतर आलेल्या सहाययक उपअभियंता थावरे यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन माघे घेण्यात आले.