किल्ले धारूर (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील एका 25 वर्षीय होतकरू मुलाने आज पहाटे अंदाजे पाच वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या कुक्कुटपालन शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही परंतु एक होत करू आणि कष्टाळू तरुण गेल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काहीतरी नवीन व्यवसाय करावा म्हणून आठ महिन्यापासून सुखदेव नायकोडे हा कुक्कुटपालनाचे शेड उभारत होता शेडचे बांधकाम पूर्ण झाले होते. शेडमध्ये कोंबडीचे पिल्ले (पक्षी ) दि. 20 रोजी येणार होते . परंतु दि .20 रोजीच त्याने त्या शेडमध्येगळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी, छोटा तीन वर्षाचा मुलगा आहे.