धनंजय मुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ
अंबाजोगाई(रिपोर्टर): अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती अत्यंत नामांकित संस्था असून याठिकाणी शेतकर्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून बाजार समितीत आलेल्या मालाला प्राधान्याने लिलाव, वजन व चोवीस तासांच्या आत पैसे घेऊन शेतकर्याला आपल्या घरी जाता यावे, अशी व्यवस्था करण्यात यावी, तसेच परळी प्रमाणेच अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक अतिशय समृद्ध व वैभवशाली बाजार समिती म्हणून सबंध मराठवाड्यात व्हावा, यासाठी या बाजार समितीत एक हाती सत्ता श्री योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून देण्याचा सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केले आहे.
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या श्री योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते नारळ फोडून मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांच्या सह सर्व उमेदवार व प्रमुख नेत्यांनी अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
या निवडणुकीत योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून ऍड.राजेश्वर चव्हाण, रामलिंग चव्हाण, दत्ता आबा पाटील, विलासराव सोनवणे, बालासाहेब सोळंके, शिवाजी सोमवंशी, ताराचंद शिंदे, श्रीमती सरस्वती आगळे, श्रीमती सुचित्रा देशमुख, अजय शेषेराव पाटील, गौतम चाटे, आनंद उर्फ बाळासाहेब देशमुख, सत्यजित सिरसाट, तानबा लांडगे, लक्ष्मण करणर हे सर्व जण निवडणूक लढवत आहेत. बाजार समितीचे भविष्यातील हित लक्षात घेऊन योगेश्वरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.
या कार्यक्रमास मा.आ.संजय भाऊ दौंड, मा.आ.पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, दत्ता आबा पाटील, सचिन काळे, गोविंदराव देशमुख, बबन भैय्या लोमटे, अमर देशमुख, शिवाजी सिरसाट, बालासाहेब शेप, वसंतराव कदम, प्रशांत जगताप, व्यंकटेश चामनर, पांडूतात्या हारे, तानाजी देशमुख, गजानन मुडेगावकर, राजाभाऊ लोमटे, बाबा भिसे, विलास मोरे, हरी अण्णा वाकडे, मदनलाल परदेशी, प्रकाश सोळंकी, अरुण पाटील, धर्मराज बिडगर, कल्याणराव भगत, बालप्रसाद बजाज, रामानुज मुंदडा, अशोक हेडे, काशिनाथ यादव यांसह अंबाजोगाई तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, सरपंच, सदस्य, व्यापारी, हमाल-मापाडी आदी उपस्थित होते.