
अंबाजोगाई (रिपोर्टर): चक्क दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याने पोटच्या मुलाने वृद्ध आईचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे आज सकाळी समोर आली आहे. मृत महिलेचे नाव चोत्राबाई भानुदास सोन्नर (वय अंदाजे 72 वर्षे) असून याप्रकरणी आरोपी मुलाला अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील मौजे येल्डा येथे रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली असुन आज सकाळी समोर आली आहे. मृत महिलेचे नाव चोत्राबाई भानुदास सोन्नर (वय अंदाजे 72 वर्षे) असून याप्रकरणी आरोपी मुलाला अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मौजे येल्डा येथील चोत्राबाई भानुदास सोन्नर या आपल्या मुलगा, सून नातवंडासह मौजे एल्डयेथे राहतात त्यांचा मुलगा अमृत वय अंदाजे पंचेचाळीस यास दारू पिण्याची सवय असून तो नेहमी दारू पिऊन धिंगाणा व शिवीगाळ करतो यामुळे त्याचे कुटुंबीय वैतागले आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच अम्रतने त्याची पत्नी व मुलांना भांडण करून सासरी पाठवून दिले आहे.
त्यामुळे घरी आई व मुलगा सध्या दोघेच असून रात्री बारा वाजता दरम्यान अमृत याने आईला दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून हुज्जत घालू लागला त्यावेळेस आईने त्याला पैसे दिले नाहीत. म्हणून चिडून जाऊन आम्रतने जवळच दगड गोटे उचलून आईच्या अंगावर टाकून दगडाने ठेचून मारहाण करू लागला यातच प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. सदरील मुलगा हा नेहमी दारू पिऊन भांडण करतो व भांडण सोडवायला येणार्याशी भांडण करतो. त्यामुळे ज्यावेळेस आरडाओरडा होत होता त्यावेळेस भीतीपोटी कोणीही शेजारीपाजारी धावून आले नाहीत. त्यामुळे वृद्ध चोत्राबाई यांचा नाहक पोटच्या गोळ्यानेच दगडाने ठेचून बळी घेतला असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी अमृत यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोत्राबाई यांचा मुलगा अमृत भानुदास सोन्नर यास ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे येल्डा गावात खळबळ उडाली आहे.








