बीड (रिपेार्टर)ः- शिक्षण विभागाच्यावतीने प्राथमीक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात दोन दोन शाळेत नाव असणे, आधारमध्ये चुका असणे यामुळे शिक्षण विभागाच्या वेबसाईटला त्यांचे आधार लिंक होत नाही असे असतांनाच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे आधारलिंक करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांचे आहेत. बीड जिल्हयतील 165 शिक्षकांचे आधार शाळेच्या वेबसाईटवर लिंक होत नसल्यामुळे हे आधार येत्या 30 एप्रिल पर्यंत लिंक करावे नसता 30 एप्रिल पर्यंत हे शिक्षक बोगस आहेत असे गृहीत धरुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे शिक्षण आयुक्तांनी फरमावले आहे.
जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी दोन दोन शाळेत नाव ठेवून आधार लिंक करतात. मात्र दोन शाळेत नाव असले तरी आधार लिंक मात्र एकीकडे होते दुसर्या शाळेत होत नाही. काही जण शाळा सोडून दुसर्या शाळेत जातात. तर काही जणांचे आधार लिंक करतांना हाताचे ठसे अपडेट होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची नेमकी संख्या लक्षात यावी आणि नेमकी संख्या लक्षात आली की शिक्षकांची संख्या लक्षात येते आणि सरकारला त्यांच्या वेतनाचा एकूण आकडा काढण्यात येतो. त्यामूळे शिक्षण विभागाने ही उठाठेव केलेली आहे. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचे आधार अपडेट करण्याचे आदेश निघाल्याने बीड जिल्हयातील 165 शिक्षकांचे आधार लिंक 30 एप्रिल पर्यंत झाले नाही तर हे शिक्षक बोगस म्हणून घोषीत करण्यात येईल. त्यांच्यावर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येईल. शासनाचा या आदेशामुळे ज्या शिक्षकांचे आधार लिंक नाही त्या शिक्षकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.