Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीआघाडी सरकाचा भाजपकडून निषेध १२ आमदारांचे निलंबन मागे घ्या

आघाडी सरकाचा भाजपकडून निषेध १२ आमदारांचे निलंबन मागे घ्या


आष्टी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन
आष्टी(रिपोर्टर): विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून आलं. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरून विरोधी पक्षाचे १२ आमदारांचे १ वर्षासाठी हे निलंबन करण्यात आले या निर्दोष आमदारांचे निलंबन केले या घटनेचा जाहीर निषेध आष्टी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करुन यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली नायब तहसीलदार शारदा दळवी यांना दि.६ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात नमूद आहे. की लोकशाहीला टाळे ठोकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले,लोकशाही ला काळे फासणा-या लोकशाहीची मुस्कटदाबी करणा-या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत असून या आमदारांचे गैरप्रकारे केलेले निलंबन तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी अनु.जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अँड वाल्मिकी निकाळजे, तालुकाध्यक्ष अँड हनुमंत थोरवे, प्रदेश कार्य.बबन आण्णा झांबरे बीड जिल्हा भाजप सचिव शंकर देशमुख , माजी सरपंच संतोष चव्हाण, भाजप नेते राजुकाका धोंडे, माजी सभापती केशव गर्जे,राम वाडेकर,जाकिर कुरेशी,समिर शेख,अँड सय्यद रिझवान,अज्जुभाई, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!