बीड (रिपोर्टर)- रमजान ईद निमित्त भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी शनिवारी आयोजित केलेल्या ईद मिलाप कार्यक्रमास पंकजाताई मुंडे, आ. सुरेशअण्णा धस यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून सलीमभाईंच्या ईद मिलापला चारचांद लावले. सलीम जहाँगीर यांनी या मिलाप कार्यक्रमातुन राष्ट्रीय एकात्मतेसह भाईचार्याचा संदेश दिला. मुस्लिम समाजातील धर्मगुरू, आजी – माजी आमदार, विविध राजकीय – सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, पत्रकार, वकील, डॉक्टर्स, इंजीनियर्स आणि सामान्य नागरिकांचीही उपस्थिती होती.
सलीम जहाँगीर यांच्या निवासस्थानी शनिवारी रमजान ईदच्या दिवशी ईद मिलाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या 20 वर्षापासून रमजान ईद दिवशी होणारा ईद मिलाप हिंदू – मुस्लिम भाईचारा निमार्ण व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात येतो. मागच्यावर्षी संत महंत यांच्या उपस्थितीत ईद मिलाप घेण्यात आला होता. यावर्षी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी स्वतः उपस्थित राहून जहाँगीर कुटुंबियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आ. सुरेश अण्णा धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अप्पर जिल्हाधिकारी जीवने पाटिल, तहसीलदार सुहास हजारे, माजी आ.राजेंद्र जगताप, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतीताई विनायकराव मेटे, रिपब्लिकन पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जेष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे, मनमोहन कलंत्री, बीआरएसचे नेते दिलीप गोरे,शिवराज बांगर यांच्यासह मुस्लिम समाजातील धर्मगुरू , विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे जहाँगीर परिवाराच्या वतीने सलीम, अलिम, कलीम जहांगीर, आजीज, तकी, कट्टूमीया, अनीस, अमीर, सोहेल यांनी स्वागत केले.