Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडभाजपाचे आमदार निलंबीत केल्याप्रकरणी जिल्ह्यात आंदोलन

भाजपाचे आमदार निलंबीत केल्याप्रकरणी जिल्ह्यात आंदोलन


बीड (रिपोर्टर)ः-विधान सभेच्या तालीका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना काल निलंबीत करण्यात आले. निलंबनाच्या प्रकरणावरुन भाजपाने आज आंदोलन छेडले. निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा भाजपाने तालुकास्तरावर निर्देशने केली. बीड, गेवराई, आष्टीसह आदि तालुक्यात आंदोलन झाले.


कालपासून विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालत तालीका अध्यक्ष भास्करराव जाधव यांच्याशी अरेरावी करत त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याने बारा भाजपाच्या आमदारांना जाधव यांनी निलंबीत केले. या निलंबनाच्या निषेधार्थ आज भाजपाने जिल्हाभरात आंदोलन केले. बीड,गेवराई, आष्टीसह इतर तालुक्यामध्ये आंदोलन झाले असून यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन प्रशासकीय अधिकार्‍यांकडे सोपवले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!