आज जन्मल्या 16 मुली 12 मुले
बीड (रिपोर्टर)ः- जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी दररोज रुग्ण दाखल होत असतात. प्रसुतीसाठी रोजा 35 ते 40 महिला अॅडमीट होतात. आज 16 मुली व 12 मुले जन्माले आले. मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे दिसून येवू लागले. महिन्यात 900 ते 1000 महिलांची प्रसुती जिल्हा रुग्णालयात होत आहे. स्त्री रुग्ण विभागात 12 डॉक्टर कार्यरत आहे.
बीड जिल्हा रुग्णालयामध्ये विविध आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने दररोज अनेक रुग्ण रुग्णालयात उपचार घेतात. प्रसुती वार्डात रोज 35 ते 40 महिला दाखल होत असतात. अडलेल्या महिलांचे सिझर केले जाते. महिन्यात 900 ते 1000 महिलांची प्रसुती होते. आज जिल्हा रुग्णालयात 16 मुली 12 मुले जन्माली आली आहे. मुलींच्या बाबतीत समाजामध्ये नकारात्मक सुर होता. मात्र हळूहळू परिस्थिती बदलू लागली. मुलींच्या जन्माचे सर्वत्र स्वागत होवू लागले. गेल्या काही वर्षापूर्वी मुलींना गर्भात मारण्याचे पाप अनेकांनी केले होते. त्याबाबत आरोग्य विभागाने ठोस भूमीका घेवून कठोर कायदे केले होते. बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढल्याचे दिसत आहे. जिल्हा रुग्णालयात डॉ.सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाचे कामकाज व्यवस्थीतपणे होत आहे. स्त्री रुग्ण विभागात 12 डॉक्टरांची टिम आहे. हे डॉक्टर 24 तास या वार्डात सेवा देत असतात. इतर कर्मचारीही वार्डामध्ये चांगले काम करत आहे.