Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रभाजपा आक्रमक विधान भवनाबाहेर प्रतिविधानसभा विधानभवनात आणि बाहेर राडा, मार्शलनी भाजपाचे माईक,...

भाजपा आक्रमक विधान भवनाबाहेर प्रतिविधानसभा विधानभवनात आणि बाहेर राडा, मार्शलनी भाजपाचे माईक, स्पीकर काढले

दुपारपर्यंतचं कामकाज
भाजप आमदारांकडून माईक काढून घेण्यात आला, तालिका अध्यक्षांच्या आदेशनंतर कारवाई
प्रतिअधिवेशनातील माईक काढून घेण्यात आले, ही महाराष्ट्रातली आणीबाणी आहे; देवेंद्र फडणवीस
फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल : गृहमंत्री
राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५०१ रिक्त पद भरण्यास अर्थ विभागाची मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
ओबीसींचे आरक्षणासंदर्भात आज कोर्टात सुनावणी झाली, अजित पवारांची सभागृहात माहिती
राज्य सरकार केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करणारे विधेयक मांडत आहे

मुंबई/बीड (रिपोर्टर):-
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ करणार्‍या विरोधी बाकांवरील बारा आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आल्यानंतर आज याचे तिव्र पडसाद विधानसभा आणि सभागृहाबाहेर म्हटले. भाजपाने आक्रमक भूमिका घेत राज्यात विविध ठिकाणी तसेच विधिमंडळाबाहेर आंदोलन सुरू केले. विधिमंडळ परिसरात प्रति विधानसभा भरवण्यात आली आणि या प्रतिविधानसभेत सरकारविरोधी धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला.

भाजपाने सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. तर भाजपाच्या प्रतिविधानसभेवर सुरक्षारक्षकांनी कारवाई करत स्पीकर आणि माईक ताब्यात घेतले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अधिकच संतापले.
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून जात माईक हिसकावून घेणे आणि अध्यक्षांच्या चेंबरमध्ये त्यांना आई-माईवर शिव्या देणे हे भाजपाला काल चांगलच अंगलट आलं. या त्यांच्या बेशिस्त वर्तनाविरोधात कारवाई करत बारा आमदारांना काल एक वर्षासाठी निलंबीत करण्यात आले. त्यानंतर अधिवेशनाच्या आज दुसर्‍या दिवशी विधानसभेत आणि विधानसभा बाहेर प्रचंड गोंधळ घालत भारतीय जनता पार्टीने प्रतिविधानसभा भरवली. प्रतिविधानसभेविरोधात भास्कर जाधव, नवाब मलिक, धनंजय मुंडे, सुरेश प्रभू यांनी सभागृहात आक्षेप घेतला. आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मार्शलला कारवाईचे आदेश दिले.
त्यानंतर मार्शलनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी कारवाई करत स्पीकर, माईक जप्त केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अधिकच संतापले. आज सकाळपासूनच विधानसभेमध्ये आणि विधानसभेबाहेर राडा पहावयास मिळाला. फडणवीसांनी नंतर सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येतोय, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात विधानसभेत काळा अध्याय लिहिला गेलाय. खोटे आरोप लावून आमच्या बारा आमदारांचं निचलंबन केलं गेलं. शांतपणे अधिवेशन सुरू असताना मार्शलला पाठवून पत्रकारांवर दंडुकेशाही केली. आमचा अधिवेशन चालणार, पण पत्रकारांना हाकलत असतील तर प्रेस रुममध्ये आमचं अधिवेशन चालणार म्हणत लोकशाहीच्या दोन्ही सभागृहांना कुलुप लावण्याचे काम ठाकरे सरकारने केलं, असे फडणवीसांनी म्हटलं. त्याचबरोबर भास्कर जाधव यांच्यापासून आम्हाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले. दुसरीकडे विधानसभेमध्ये कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी फोन टॅपिंग संदर्भात गंभीर आरोप केले. माझा फोन टॅप होत असल्याचेही त्यांनी म्हटले. तर मुख्यमंत्र्यांनी दुपारपर्यंतच्या कार्यकाळात जिल्हा परिषद पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात याव्यात किंवा त्यावर काय करता येईल याविषयी राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असं कोर्टाने सांगितलं आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सचिवांना राज्य निवडणूक आयोगाशी बोलून पुढील कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिली आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. एकूणच आज दुपारपर्यंत विधानसभेत आणि विधानसभे बाहेर प्रचंड राडा पहावयास मिळाला.

Most Popular

error: Content is protected !!