बीड (रिपोर्टर) पिण्याच्या पाण्यासाठी रायमोहा, खरगवाडीसह आदी गावांसाठी राखीव असलेल्या रायमोहा, खरगवाडी तलावावर मोठ्या प्रमाणात मोटारी टाकून पाणीसाठा अवैधपणे उपसला जात आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मे महिन्यात जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते.
रायमोहा आणि खरगवाडी येथील तलावातून रायमोहासह खरगवाडी आणि परिसरातील गावांना पिण्याचे पाणी वापरले जाते. कडक उन्हाळ्यात जनावरांची तहान हाच तलाव भागवतो. मात्र सध्या या तलावात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी अवैधरित्या मोटारी टाकून पाणी उपसा सुरू केला आहे. त्यामुळे या तलावाने आताच तळ गाठला. मे महिन्यात हा तलाव कोरडा पडल्यास नागरिकांसह जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आताच अवैध मोटारी टाकणार्यांवर कारवाई करून हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे, अशी मागणी होत आहे.