आडसकर गटाचे 11 तर राष्ट्रवादीचे 4 जागा निवडुण
आले 3 उमेदवार बिनविरोध निवडुण आले होते
केज (रिपोर्टर)ः- केज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक अटीतटीची झाली. अनेक वर्षापासून ही बाजार समिती आडसकर यांच्या ताब्यात आहे. यावेळी नेमकं काय होते याकडे तालुक्याचं लक्ष लागून होतं. पुन्हा बाजार समिती रमेश आडसकर यांनी ताब्यात घेतली. आडसकर गटाचे अकरा उमेदवार निवडुण आले. राष्ट्रवादीच्या 4 उमेदवाराला गुलाल लागला. आडसकरांचे तिन उमेदवार बिनविरोध निवडुण आले होते. आडसकर गटाच्या ताब्यात 14 जागा आल्याने बाजार समिती एक हाती रमेश आडसकर यांच्या हातात आली आहे.
केजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तिन पॅनल पडले होते. एक पॅनल रमेश आडसकर दुसरा राष्ट्रवादीचा तर तिसरा शिवसेनेचा होता. दोन पॅनलमध्ये खरी लढत होती. काल मतदान झाल्यानंतर आज सकाळी मतमोजणी झाली. ही मतमोजणी शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात झाली. रमेश आडसकरांच्या गटाच्या 11 जागा विजयी झाल्या. तिन जागा त्यांच्या यापूर्वीच बिनविरोध निघाल्या होत्या. आडसकर गटाचे एकूण 14 जागा आल्याने एकहाती सत्ता त्यांनी निर्माण केली आहे. राष्ट्रवादीला अपयश आले. राष्ट्रवादीच्या फक्त चार जागा विजयी झाल्या. शिवसेनेला तर खातेही उघडता आले नाही. आडसकर गटाचे विजयी उमेदवार इंगळे अंकुश, इखे राधेशाम, केदार वसंत, खोडसे रामकिसन, देशमुख अशोक, शिंदे नेताजी, पवार बापूराव, आगे गयाबाई, भाकरे अवंतिका, पाटील पशुपतीनाथ, नेहरकर वासूदेव, तर राष्ट्रवादीचे जाधव पुरूषोत्तम, पटाईत सुरज, राऊत अरुण, सोनवणे भागवत निवडुन आले आहे. विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला.