बीड (रिपोर्टर) शिक्षण विभागातील वरिष्ठ लेखा सहायक गोरे हे अर्थपुर्ण व्यवहारातून गेले चार-चार महिने शिक्षण विभागातील विस्तार अधिकार्याचे पगार करीत होते. ज्यांचा गटविमा द्यायचा त्यांच्या गटविम्याचे पैसेही वेळेवर देत नाहीत. पेन्शनधारकांनी चक्क गोरेंच्या विरोधात सीईओ पवार यांच्याकडे धाव घेतली होती. पवारांनी याची दखल घेऊन निलंबनाचे आदेशही तयार केले होते मात्र शेवटी अर्थपुर्ण व्यवहारातून गोरे यांनी आपले निलंबन रद्द करून घेत बांधकाम विभागात बदली करून घेतली.
शिक्षण विभागातील वरिष्ठ लेखा सहायक गोरे हे वादग्रस्त कर्मचारी म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सर्वात जास्त अडवणूक पेन्शनधारकांची केली. त्यामुळे पेन्शनधारकांनी एकत्रित होत सीईओ पवार यांच्याकडे गोरे यांची तक्रार केली. सोबतच ज्या कर्मचार्यांचे नातेवाईक मृत्यू पावलेत, अशांचे गटविम्याचे पैसेही या कर्मचार्यांना चार-चार महिने दिले नाहीत. विस्तार अधिकारी आणि इतर कर्मचार्यांचे तीन-तीन महिन्यांचे पगार दिले नाहीत. या सर्व तक्रारींचा कहर झाल्यानंतर सीईओ पवार यांनी गेल्या आठवड्यात गोरे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्याची सूचना शिक्षण विभागाला दिली. निलंबनाची फाईलही तयार झाली मात्र शेवटच्या क्षणी सीईओ पवार यांची सही न होता मध्यस्थ वरिष्ठ अधिकार्यांच्या अर्थपुर्ण व्यवहारातून गोरे यांनी आपले निलंबन रद्द करत बांधकाम विभागात बदली करून घेतली.