नेकनूरमध्ये व्यापार्याचं घर फोडलं
15 तोळे सोने, नगदी 70 हजार पळवले
घरी कोणी नसल्याने चोरट्यांनी साधली संधी
तपासासाठी श्वान पथकाला पाचारण
नेकनूर (रिपोर्टर)ः- घरी कोणी नसल्याची संधी साधून एका कृषी व्यापार्याच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश करुन घरातील 15 तोळे सोन्याचे दागिने व नगदी 70 हजार रुपये चोरून नेल्याची घटना रात्री घडली. आज सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी नेकनूर पोलीस दाखल झाले होते. चोरीच्या तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरीची घटना शिक्षक कॉलनी भागात घडली.
श्रीराम जगताप हे कृषी दुकानदार आहेत. ते आपल्या कुटूंबासमवेत वैष्णव देवीच्या दर्शनाला गेलेले आहेत. याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेवून त्यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यातील 15 तोळे सोन्याचे दागिने व नगदी 70 हजार रुपये चोरुन नेले. सकाळी शेजार्यांना जगताप यांच्या घरी चोरी झाल्याचे निर्दशनास आले. या घटनेची माहिती नेकनूर पोलीसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.