7 हजार 200 विद्यार्थी बसले; परीक्षा दरम्यान कडेकोट बंदोबस्त
बीड (रिपोर्टर) एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी ‘निट’ परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. आज देशभरामध्ये ‘निट’ची परीक्षा घेतली जात असून बीड जिल्ह्यामध्ये 19 परीक्षा केंद्र आहेत. या केंद्रांवर 7 हजार 200 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी ‘निट’ अनिवार्य करण्यात आले. दरवर्षी ही परीक्षा केेंद्र सरकारच्या माध्यमातून घेतली जाते. या परीक्षेला देशभरातील लाखो विद्यार्थी बसतात. आज ही परीक्षा होत असून बीड जिल्ह्यात एकूण 19 परीक्षा केंद्रे आहेत. या केंद्रांवर 7 हजार 200 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पेन व्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तू परीक्षा केेंद्रात घेऊन जाण्यास परवानगी नाही. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.