मुंबई (रिपोर्टर) राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा हा विषय आता संपलेला आहे. अजित पवार यांच्याबद्दल बरेच गैरसमज पसरवले जातात, असे शरद पवार यांनीच म्हटले आहे. जे साहेबांचे मत आहे, तेच माझे म्हणणे आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आपली भूमिका मांडली. महाविकास आघाडी कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल, आघाडीला कुठलाही धक्का लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार आज माध्यमांसमोर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी कामाचा माणूस आहे, मी स्थानीक काम करत होतो, परंतु मी दिल्लीला गेलो, अशा अफवा पसरविल्या गेल्या. त्याचबरोबर अजित पवारांनी आठवडाभराच्या कार्यक्रमाची माहिती देत कोणीही गैरसमज करू नये, असेही आवाहन केले. महाविकास आघाडी कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. आम्ही सर्व एकत्र आहोत, महाविकास आघाडीला कुठलाही धक्का लागणार नसल्याचे सांगत अजित पवार यांनी आज भूमिका स्पष्ट केली. जेव्हा अजित पवारांना शरद पवारांचे अजित यांच्याबाबत बरेच गैरसमज पसरविले जातात या वक्तव्या बाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवारांनी एका वाक्यात ‘जे साहेबांचे मत तेच आमचे मत आहे’, असे स्पष्ट केले.