बीड (रिपोर्टर) शेतीला जोड व्यवसाय हवाय, शेतकर्यांची आर्थिक प्रगती व्हावी या दृष्टीकोनातून फळबागासह तुतीची लागवड रोहयोतून केली जाऊ लागली, मात्र रोहयोचा कारभार अनागोंदी असून बीड तहसील कार्यालयातील नरेगा विभागामधील ऑपरेटरच्या मनमानीमुळे तीन महिन्यापासून तुतीचे मस्टर निघाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याबाबत जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालून तात्काळ मस्टर काढण्याचे द्यावेत, अशी मागणी केली जाऊ लागली.
बीड जिल्ह्यात तुतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढला. तुती रोजगार हमी योजनेतून लागवड केली जाऊ लागली. नियमितपणे मस्टर निघणे गरजेचे आहे मात्र तहसीलमधील नरेगा विभागातील ऑपरेटर मस्टर काढत नाहीत. तीन महिन्यांपासून मस्टर निघाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले. बीड तालुक्यात 227 एकरमध्ये तुतीची लागवड करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सदरील ऑपरेटरवर कारवाई करावी अशी मागणी तुती उत्पादक शेतकर्यांतून केली जात आहे.