गेवराई (रिपोर्टर) गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींच्या निवडीची प्रकिया दि.15 मे रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये सभापतीपदी मुजीब पठाण तर उपसभापतीपदी विकास सानप यांची सर्वानुमते निवड जाहिरात करण्यात आली. निवडीबद्दल त्यांचे माजी आमदार अमरसिंह पंडीत, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडीत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा ताब्यात घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्वाचित वर्चस्व राखले आहे. तर दि.15 मे रोजी गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींच्या निवडीची प्रकिया पार पडली यामध्ये सभापतीपदी मुजीब पठाण तर उपसभापतीपदी विकास सानप यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी त्यांचे अभिनंदन करुन कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन निवडीचा जल्लोष साजरा केला.