आज पदभार घेतला, एक महिना काम पाहणार
पदभार घेताच अधिकार्यांसह कर्मचार्यांना केले ताईट
बीड (रिपोर्टर) प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी जिवणे यांच्याकडे बीड पंचायत समितीचा गटविकास अधिकारी पदाचा चार्ज देण्यात आला. एक महिनाभर ते पं.स.चा कारभार पाहणार आहेत. पदभार घेताच त्यांनी अधिकार्यांसह कर्मचार्यांना चांगलेच फायलावर घेत सर्वसामान्य नागरीकांची कामे तात्काळ झाली पाहिजेत, अशी तंबी त्यांनी कर्मचार्यांना दिली आहे.
आदित्य चंद्रभान जिवणे हे भा.प्र.सेवा परीक्षा पास झालेले आहेत. ते प्रशिक्षणार्थी म्हणून बीड येथे आलेले आहेत. त्यांच्याकडे बीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा चार्ज देण्यात आला. 15-5-2023 ते 9-6-2023 असा चार आठवडे ते स्वतंत्र कारभार पाहणार आहेत. आज त्यांनी पदभार स्वीकारला असून अनिरुद्ध सानप यांनी जिवणे यांच्याकडे चार्ज दिला. सर्वसामान्य नागरीकांसह शेतकर्यांची कामे तात्काळ झाली पाहिजेत, पं.स.मध्ये कोणाचीही अडवणूक होता कामा नये, अशी तंबी जिवणे यांनी सर्व अधिकारी, कर्मचार्यांना दिली आहे.
इंजिनिअर सरवदे यांच्याकडून शेतकर्यांची अडवणूक
बीड पंचायत समितीअंतर्गत अनेक योजना राबविलल्या जातात त्यात वैयक्तिक सिंचन विहीरी, घरकुल, फळबाग इत्याचा सहभाग आहे. काही अधिकारी, कर्मचारी सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम करत आहेत, त्यामध्ये इंजिनिअर अभिजीत सरवदे हे शेतकर्यांची सतत अडवणूक करत असतात. अडवणूक करणार्या अशा अभियंत्यांना धडा शिकवण्याचे काम नवनियुक्त गटविकास अधिकारी जिवणे यांनी करावे, अशी मागणी होत आहे.