भिल्ल वस्तीवर जावून रेशन कार्ड काढून धान्याचे वाटप केले
बीड (रिपोर्टर) समाजामध्ये आजही अनेक समाज विविध योजनेपासून वंचीत राहत आहेत. वंचीत समाजाला प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना आखत आहे. मांडवजाळी येथे भिल्ल वस्तीवर जावून तहसीलदारांनी तेथील नागरिकांचे रेशन कार्ड काढून त्यांना धान्याचे वाटप केले. या वेळी हजारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश कुटुंब विविध योजनेपासून वंचित राहत आहेत. विशेष करून भटका समाज आजही गावामध्ये स्थिर नाही. ज्यांच्याकडे राशन, आधारकार्ड नाही, अशा नागरीकांचे कागदपत्र काढून देण्याचे आदेश शासनाने प्रशासकीय अधिकार्यांना दिले. बीड तालुक्यातील मांडवजाळी येथील भिल्ल वस्तीवर जावून तहसीलदार सुहास हजारे यांनी नागरीकांचे राशन कार्ड काढून त्यांचे आधार कार्ड लिंक करून दिले तसेच धान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी हजारे यांच्या सोबत पेशकार संतोष मुळीक, श्रीराम वायभट यांच्यासह आदींची उपस्थिती होती.