Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeन्यूज ऑफ द डेनेकनूरच्या रुग्णालयात टगेपणा करणार्‍या

नेकनूरच्या रुग्णालयात टगेपणा करणार्‍या

नेकनूरच्या रुग्णालयात टगेपणा करणार्‍या
पो. उपनिरीक्षक जाधवला निलंबीत करा
बीड (रिपोर्टर):- आरोपीच्या मेडिकलसाठी रुग्णालयात आलेल्या नेकनूर येथील पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी सय्यद नाजिया हाशम यांच्याशी अरेरावी करत अर्वाच्च भाषेत धमकावले. सदरचा प्रकार हा घृणास्पद आणि पोलिसी वर्दीचा गैरफायदा घेणारा असून अशा टगेबाज उपनिरीक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी समाजसेवक मोईन मास्टर, ऍड.हेमा पिंपळे, जाकेर मौलाना, खुर्शीद आलम, ऍड. शफीक शेख, शेख मतीन, बरकत पठाण यांनी केली आहे.
नेकनूर येथील कुटीर रुग्णालयात कार्यरत असणार्‍या डॉ. सय्यद नाजिया हाशम यांचे कोविड काळातले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य रुग्णाच्या सेवेसाठी त्या सातत्याने तत्पर असतात. मात्र अशा कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकार्‍याला नेकनूर येथील पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी अरेरावीची केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली. आरोपीचे मेडिकल करण्यासाठी आलेल्या विलास जाधव यांनी रुग्णालयात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद नाजिया यांच्यासोबत हुज्जत घालत आरडाओरड करून गोंधळ घातला. फुकटच्या पगारा घेतात, काम करत नाहीत, असं म्हणत थेट वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खुर्चीवर जावून बसून जाधव यांनी (पान ७ वर)
आपला टगेपणा दाखविला. या प्रकरणाची लेखी तक्रार डॉ. सय्यद नाजिया यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली असली तरी विलास जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मोईन मास्टर, ऍड.हेमा पिंपळे, जाकेर मौलाना, खुर्शीद आलम, ऍड. शफीक शेख, शेख मतीन, बरकत पठाण यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!