वी दिल्ली (वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सम्मान निधीची योजनेचा 14वा हप्ता जारी केला आहे. राजस्थान दौर्यावर सीकर येथील एका
कार्यक्रमादरम्यान त्यांनी शेतकर्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये हस्तांतरित केले. शेतकर्यांच्या खात्यात त्यांच्या हक्काचे पैसे जारी करताना पंतप्रधान म्हणाले की पीएम किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. त्यांनी म्हटले की, 14व्या हप्त्यापर्यंत 2 लाख 60 हजार कोटी रुपये थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
थेट (डायरेक्ट) लाभ हस्तांतरणाद्वारे दोन हजार रुपयांचा 14वा हप्ता थेट देशातील 8.5 कोटी शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या 14व्या हप्त्याद्वारे 17 हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकर्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे.