सुभाष रोडवर घडली घटना
बीड (रिपोर्टर): कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचार्यालाच एका कारने धडक दिल्याने यात सदरील कर्मचारी जखमी झाला. ही घटना काल सुभाष रोडवर घडली असून या प्रकरणी चालकाविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी नेहमीच वाहतूक जाम होत असते. काही वाहनधारक व्यवस्थीतपणे आपली वाहने लावत नसल्याने त्याचा अडथळा वाहतुकीसाठी होतो. भाजी मंडई, सुभाष रोड यासह अन्य परिसरात वाहतुकीचे प्रश्न आहेत. काल दुपारी विष्णू काकडे नामक वाहतूक शाखेचे कर्मचारी सुभाष रोडवर कर्तव्य बजावत होते. या वेळी त्यांना एका चारचाकी गाडीने धडक दिल्याने यात ते जखमी झाले. सदरील चालक अक्षय तुकाराम खोपे (रा. गुंजथडी ता. माजलगाव) बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजी मंडई, सुभाष रोड यासह अन्य रस्त्यांवर दुचाकी वाहन चालक रस्त्यावर सर्रास दुचाकी पार्क करत असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. पोलीसांनी सांगूनही काही वाहनधारक जाणीवपुर्वक आडवेतिडवे वाहने लावतात. अशा वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. बहुतांश व्यापार्यांकडे स्वत:ची पार्किंग नसल्यामुळे यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.