Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमकोल्हापुरात नरबळी

कोल्हापुरात नरबळी


कोल्हापूर (रिपोर्टर)- शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव राकेश केसरे या सहा वर्षीय बालकाचे दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाले होते. दोन दिवस शाहूवाडी पोलीस त्याचा शोध घेत होते. घराच्या दारात खेळत असताना त्या बालकास कुणीतरी फूस लावून पळवून नेले. त्यामुळे पोलीस गावातील विविध ठिकाणी त्याचा शोध घेत होते. मंगळवारी सकाळी आरव याचा मृतदेह घराच्या मागील बाजूस आढळला. त्याच्या अंगावर बर्‍याच ठिकाणी जखमा होत्या. याशिवाय हळदीकुंकूही लावल्याचे दिसत होते. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.


सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. तेथून तो त्याच्या पालकांना देण्यात आला. हा नरबळी आहे की पोलीस यंत्रणेला चकवा देण्यासाठी मुद्दाम केलेली ही खेळी आहे, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. कागल तालुक्यातील सावर्डे येथे महिन्यापूर्वी असाच प्रकार घडला होता.

Most Popular

error: Content is protected !!