आयजीच्या पथकाची परळीत कारवाई
जुगार्यांवर कारवाई, मुद्देमाल जप्त
परळी (रिपोर्टर) परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणार्या ऑनलाइन चक्री नावाच्या जुगारावर औरंगाबाद येथील पोलीस पथकाने कारवाई केली असून याप्रकरणी याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात नऊ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहर पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील पद्मावती गल्ली, हनुमान नगर, साठे नगर, देशमुख पार, पेठ मोहल्ला, संत तुकाराम नगर, हबीब पुरा, व इतर भागात ऑनलाइन चक्री ( बिंगो )नावाचा जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती बीड येथील पोलीस पथकाला मिळाली सदरील माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने या सर्व ठिकाणी छापा मारला असता या ठिकाणी नऊ आरोपी ऑनलाइन चक्री नावाचा जुगार खेळवत असताना आढळून आले तसेच त्या ठिकाणी काही लोक ऑनलाईन चक्रीवर (बींगो) पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले यावेळी या आरोपींकडून 21 हजार 130 रुपये रक्कम तसेच मोबाईल व एक कॉम्प्युटरचे सीपीयू आणि मॉनिटर असा एकूण एक लाख 4 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून म्हणून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात आष्टीचे पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात मनोज स्वामी, दिनेश जावळे, नितीन चौरे, महादेव मोरे, शेख मोहद्दीन शेख ताहेर,विष्णू भोसले, शेख आमिर शेख नासिर, माऊली मनोहर मुंडे, अजय रामसिंग ठाकूर यांच्या विरोधात गु र न 162/2023 कलम 12 अ.मु.जू. का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे हे करीत आहेत.