Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडसातव्या दिवशीच संपकर्‍यांकडून सरकारचा दहावा, शेकडो कर्मचार्‍यांनी केले मुंडन; एसटीचे कर्मचारी संपावर...

सातव्या दिवशीच संपकर्‍यांकडून सरकारचा दहावा, शेकडो कर्मचार्‍यांनी केले मुंडन; एसटीचे कर्मचारी संपावर ठाम


बीड (रिपोर्टर)- एसटीच्या कर्मचार्‍यांचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून राज्यभरातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत. या संपामुळे राज्यभरातील एसटीची वाहतुक ठप्प झाली असून आज राज्य सरकारच्या निषेधार्थ महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. कर्मचार्‍यांचे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरुच आहे.

44 1

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना तुटपुंजा पगार मिळत असल्याने या पगारावर कर्मचार्‍यांचा घरप्रपंच चालत नाही. महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून राज्यभरातील एसटीच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला. या संपामुळे एसटीची वाहतूक पुर्णत: खोळंबली आहे. शासनाने अद्यापपर्यंत संपावर कुठलाही तोडगा काढलेला नाही. राज्य सरकार जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. राज्य शासनाच्या निषेधार्थ आज कर्मचार्‍यांनी मुंडन करून निषेध केला आहे.


आंदोलनाला निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचा पाठिंबा
एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी जे आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला निवृत्त कर्मचारी (1995) समन्वय समितीने आपला पाठिंबा दर्शवला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात जिल्हाध्यक्ष महारुद्र मोराळे, दिलीपराव चिंचोलकर, सुर्यभान नवले पाटील, शिरमेवार, बाबासाहेब जाधव, वीर, बासिद इनामदार, अभिमान बहिर, कांबळे, श्रीनिवास लाहोटी, लक्ष्मण शिंदे, बप्पा धांडे, जोगदंड, सर्जेराव काळे, सुदाम कोळेकर यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!