बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काल पीएसआय सुतळे यांच्या टीमने एका चोरट्यासह सात दुचाकी जप्त केल्या तर आज पीएसआय तुपे यांच्या टिमने चौदा दुचाकी आणि चोरट्याला जालना येथून ताब्यात घेतले आहे. या कारवाया स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जात आहेत. याकडे स्थानिक गुन्हे शाखेने विशेष लक्ष केंद्रित करत दुचाकी चोरांना टार्गेट केले. काल स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय सुतळे यांच्या टीमने एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आज पीएसआय संजय तुपे यांची टीम जालना येथे गेली असून त्या ठिकाणी काही आरोपींसह चौदा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्या दुचाकी घेऊन पोलिस बीडच्या दिशेने येत आहेत. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय तुपे एएसआय तुळशीराम जगताप, भागवत शेलार, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, नसीर शेख, राहुल शिंदे, चालक गणेश मराडे यांनी केली.