बीड (रिपोर्टर)- राज्याच्या राजकारणाला दिशा देण्याबरोबर पक्षातील आपआपल्या समर्थकांना संदेश देण्याहेतू आयोजीत दसरा मेळाव्याची मुंबई आणि बीड जिल्ह्यात तयारी झाली आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा शिवतर्थावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होत असून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा परंपरेनूसार संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या जन्मगावी म्हणजेच सावरगांव याठिकाणी दसरा मेळावा होत असून जाहीर सभांची तयारी पुर्णतःकडे आहे. मात्र या वर्षी मराठा आरक्षणासाठी पेटवून उठल्याचे दिसून येत आहे. गावागावात नेत्यांना बंदी घालण्यात येत आहे. राजकीय पक्षाच्या सभांकडे मराठा समाज पाठ फिरवत आहे. अशा स्थितीत या दसर्या मेळाव्यामधून ठाकरे,मुंडे, शिंदेंच्या तोफा धडाडणार असल्या तरी मराठ्यांची किती रसद या मेळाव्याच्या सदरेवर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन उभं केलं आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यातला अवघा मराठा एकवटलेला पहावयास मिळत आहे. 24 तारखेपर्यंत म्हणजे उद्या विजय दशमी दिवशी आरक्षण देण्याबाबतचं अल्टीमेट जरांगे यांनी सरकारला दिलं होतं. गेल्या 40 दिवसाच्या कालखंडात जरांगे यांच्या राज्यभरात अनेक सभा झाल्या. या सभांना उन, (पान 7 वर)
पावसात रात्री अपरात्री लाखोंच्या गर्दीने मराठ्यांनी उपस्थिती दर्शवली. त्याच बरोबर अनेक गावामध्ये आरक्षण मिळेपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली. पक्षाच्या कुठलाच कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला. अशा स्थितीत पारंपारीक दसरा मेळावे मुंबई आणि बीड जिल्ह्यात होत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा बहुचर्चीत असतो. पुढे हा मेळावा कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी सुरू ठेवला. शिवसेनेत फुट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरेंचा वेेगवेगळा मेळावा होत आहे. उद्या ठाकरेंचा मेळावा शिवतिर्थावर तर शिंदेचा मेळावा आझाद मैदानावर होत आहे. इकडे सावरगांव येथे भाजपाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा मेळावा होत आहे. मात्र या मेळाव्याला मराठयांची रसद जाणार का? याकडे राज्याचे लक्ष आहे. दसरा मेळाव्यातून ठाकरे,मुंडे, शिंदे यांच्या तोफा धडाडणार मात्र सदरेवर मराठा शिलेदार अत्यल्प दिसणार असल्याने या तिनही ठिकाणाहून आरक्षासह महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीवर कोण काय भाष्य करणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.