धनगर जमातीला अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी करा
बीड (रिपोर्टर)ः- धनगर जमातीला अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज सकल धनगर समाज बीडच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भारतीय संविधानानूसार कलम 342 मध्ये अनुसुचीत जमातीला आरक्षण दिलेले आहे. या कलमा परिशिष्ट 36 वर धनगर जमातीला आरक्षण आहे. परंतू आजपर्यंत महाराष्ट्रातील धनगर जमातीला न्याय हक्कापूसन वंचीत ठेवण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले आहे.दरम्यान शासनाने धनगर समाजाच्या मागणीची दखल घ्यावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माधव निर्मळ, गणपत काकडे, शिवाजी राऊत, विष्णु देवकते, अमोल ढोणे, राजू शिंदे, मिनाक्षी देवकते यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.