बीड (रिपोर्टर)- प्रशासनाकडून शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसून सदरील अंमलबजावणी करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे तर ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आमरण उपोषण करण्यात आले आहे.
शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, कोरोना कालावधीतील गुन्हे रद्द करावे, महाराष्ट्र शासनाने 350 वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवकालीन मंगलचिन्ह आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखीत करणार्या बोध चिन्हाचा वापर करण्यात यावा, या सह इतर मागण्यांसाठी गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे तर मराठा समाज ओबीसी प्रवर्गात सामील करून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी ओबीसी क्रांती परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे. या वेळी किरण राजेंद्र चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.